वूमन्स पॉवर फौंडेशन

महिलांकडून कोणतेही सामाजिक उपक्रम राबविले जात नसल्याचा ठपका खोडून काढण्यासाठी वूमन्स पॉवर फौंडेशन या संस्थेची स्थापना ६ जून रोजी करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सातारकरांसाठी आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची आमची संकल्पना आहे. या कार्याचा शुभारंभ अंबवडे परीसरात वृक्षारोपण करून आम्ही सर्व महिलांनी केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महिलेला आम्ही या कार्यात सहभागी करून घेणार असल्याचे अध्यक्षा सौ.वर्षा भोसले यांनी सांगितले. यावेळी अंजली शिंदे, स्मिता देशमुख, पल्लवी शिंदे, श्रद्धा पवार, मेघमाला कदम, चित्रा भिसे, वृषाली गायकवाड, पूजा कवठेकर आदी महिला या उपक्रमात सहभागी आहेत.

संस्थेचे उद्देश

  • १) ग्रामीण व शहरी भागात मुला-मुलींसाठी अंगणवाडी, बालवाडी, प्राथमिक, पूर्व प्राथमिक, पूर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर शिक्षणाची सोय यासह तांत्रिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक, औद्योगिक, कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, शिक्षणशास्त्र, फार्मसी, नर्सिंग, व्यवस्थापकीय, पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन, पर्यावरण, संगीत, मराठी, हिंदी, इंग्रजी व आवश्यक न्या भाषेच्या मध्यमातुन शिक्षण देणेच प्रयत्न करणे.
  • २) इंग्रजी माध्यमाची शाळा मोफत सुरु करणे तसेच एल .के . जी., यु. के. जी. वर्ग सुरु करणे. 
  • ३) शिक्षणाचा प्रचार प्रसार होणेसाठी विद्यालये, महाविद्यालये उदा. डी. एड., बी. एड. वैद्यकीय महाविद्यालये, कृषी महाविद्यालये, पदविका महाविद्यालये इ. चालू करणेचा प्रयत्न करणे.
  • ४) दिव्यांग मुला - मुलींसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण देणे.
  •  ५) मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अल्पसंख्यांक आदिवासी व भटक्या विमुक्त जाती जमाती इ. लोकांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण देणे.
  • ६ ) व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार, रक्तदान करणे, नेत्रतपासणी, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, वृक्षसंगोपन इ. कार्यक्रम पार पडणे.
  • ७) संस्थेमार्फत महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण देणे.चर्चासत्रे आयोजिय करणे व मार्गदर्शन करणे.
  • ८) युवक व युवतीच्या कलाना वाव देणेसाठी वक्तृत्व, निबंध, नाट्य, नुर्त्य, संगीत इ. विविध कलांचे व सर्व प्रकारच्या  क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देणे .तसेच जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा घेणे.
  • ९) महिलाच्या  सामाजिक ,आर्थिक विकासाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे ,तसेच आरोग्य शिबीर  व व्यायाम प्रशिक्षणाचे  शिबीर व कोर्सस सुरु करणे.
  • १०) राष्टीय सण उदा. १५ ऑगस्ट ,२६ जानेवारी ,महापुरुषांची जयंती व उत्सव इ. सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करणे, संस्थेमार्फत  समाजातील मान्यवरांना पुरस्कार देणे.
  • ११) लेख वाचवा अभियान राबिवणे.
  • १२) पर्यावण संतुलनासाठी वनीकरण,वृक्षतोडबंदी व पर्यावण जागृती करणे.
  • १३) पाककला ,फॅशन डिसिग्निंन्ग  ,ब्युटी पार्लर इ .ठिकाणी वोकॅशनल कोर्सस विषयी मार्गदर्शन करणे.
  • १४) निराश्रित ,विधवा स्त्रियांसाठी मोफत वसतिगृहाची सुविदा उपलब्द करणे व मोफत  उडगोविषयी मार्गदर्शन करणे. महिलां सती समुपदेशन केंद्र चालवणे.
  • १५) अंध ,अपंग ,विकलांग इ . घटकांसाटी कल्याणकारी योजनांची माहिती देणे .तसेच व्यवसाहिक प्रशिक्षण मार्गदर्शन करणे.
  • १६) रुग्णवाहिकाची  मोफत सेवा उपलब्द करून देणे.
  • १७) जेस्ट नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविणे. निराकार वृदांसाठी सेवाभावी उपक्रम राबिवणे,तसेच मोफत वृद्रश्राम सुरु करणे.
  • १८) विणकाम ,भरतकाम,टंकलेकं,कॉम्पुटर शिवण क्लास इ. मोफत प्रशिक्षण वर्ग सुरु करणे.
  • १९) गरीब होतकरू व निराकार विद्यार्तीचे शैक्षणिक गरज पुरविण्यासाठी मदत करणे.
  • २०) संस्थेमार्फत  महिलांसाठी व्योमशाळेची निर्मिती व सुविधा उपलब्द करून देणे व योग्य प्रशिक्षण देणे.