News 
    "वूमेन्स पॉवर फौंडेशन" च्या वतीने आंबवडे परिसरात वृक्षरोपण ( Women's Power Foundation )

    Posted On June 30,2019

      

    "वूमन्स पॉवर फौंडेशन"

    महिलांकडून कोणतेही सामाजिक उपक्रम राबविले जात नसल्याचा ठपका खोडून काढण्यासाठी वूमन्स पॉवर फौंडेशन या संस्थेची स्थापना ६ जून रोजी करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सातारकरांसाठी आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची आमची संकल्पना आहे. या कार्याचा शुभारंभ अंबवडे परीसरात वृक्षारोपण करून आम्ही सर्व महिलांनी केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महिलेला आम्ही या कार्यात सहभागी करून घेणार असल्याचे अध्यक्षा सौ.वर्षा भोसले यांनी सांगितले. यावेळी अंजली शिंदे, स्मिता देशमुख, पल्लवी शिंदे, श्रद्धा पवार, मेघमाला कदम, चित्रा भिसे, वृषाली गायकवाड, पूजा कवठेकर आदी महिला या उपक्रमात सहभागी आहेत.